नागपूर,
Nagpur weather update, नागपूरसह काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती,वर्धा, भंडारा,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला,गोंदिया, नागपूर शहराला पावसाचा फटका बसला. शुक्रवार,३१ ऑक्टोबर रोजी अमरावती, भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. ’मोंथा’ चक्रीवादळाचा फटका विदर्भातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. गत तासात नागपुरात १०.८ मिमी पावसाची नोंद केली तर सर्वाधिक पाऊस गडचिरोलीत ७२.२ मिमी, चंद्रपूर ६६.० मिमी, अमरावती ५९.६ मिमी, वर्धा ३१.० मिमी, भंडारा २७.० मिमी, यवतमाळ २०.० मिमी, वाशिम १७.८ मिमी, बुलढाणा १४.०मिमी, अकोला १३.३ मिमी तर सर्वात कमी ५.४ मिमी पाऊस गोंदियात झाला.
मोंथा चक्रीवादळामुळे नागपूरसह विदर्भात अवकाळी संकट कायम असून शुक्रवारी काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आंध्र प्रदेशच्या सीमेवर वादळ धडकल्यानंतर आता कमकुवत झाले असून गुरुवारी सकाळी विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मोंथा’ चक्रीवादळामुळे अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने नागपूरसह काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून विदर्भात अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा याठिकाणी पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शनिवार नंतर वातावरण मोकळे होण्याची शक्यता आहे.मोंथा’ चक्रीवादळामुळे विदर्भातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला असून कापूस, तूर आणि संत्रा उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने शुक्रवारसाठी ऑरेंज जारी केला आहे. विदर्भातील शेतकर्यांनी त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.