आंतरराष्ट्रीय व्यापार आणि औद्योगिक सहकार्यासाठी एआयडी - जीआयबीएफ सोबत सामंजस्य करार

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
international trade विदर्भ आणि इतर देशांमधील आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्याला चालना देण्यासाठी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) ने इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) आघाडीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय मंडळासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.या सामंजस्य कराराचा उद्देश विशेषतः आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे हा आहे. त्याचबरोबर दोन्ही संस्थांमधील ज्ञानाची, माहितीची देवाणघेवाण, प्रशिक्षण आणि नेटवर्किंगला प्रोत्साहन देणे यामुळे शक्य होणार आहे. या करारामुळे मध्य भारतातील उद्योगांसाठी निर्यात आणि आयातीमध्ये संधी निर्माण होतील.
 
 
 
international trade
 
 
हा अ‍ॅडव्हांटेज विदर्भाच्या आगामी तिसर्‍या आवृत्तीच्या आधी करण्यात आला आहे, जेणेकरून जीआयबीएफच्या सहकार्याने विदर्भाच्या विशिष्ट व्यावसायिक गरजांवर आधारित ७-८ प्रमुख राष्ट्रांसह अनेक देशांना व्यवसायाच्या संधिसाठी सहभागी करून घेता येऊ शकेल. या सामंजस्य करारावर औपचारिक स्वाक्षरी जीआयबीएफचे संस्थापक आणि ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी आणि एआयडीचे आशिष काळे यांनी केली आणि मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या प्रसंगी जीआयबीएफच्या सरचिटणीस आणि सह-संस्थापक दीपाली गडकरी, एआयडीचे सचिव डॉ. विजय कुमार शर्मा, एआयडीचे कार्यकारी सदस्य अविनाश घुशे आणि एआयडीचे कार्यकारी सचिव पंकज भोकरे उपस्थित होते.
विदर्भ क्षेत्रात औद्योगिक विकासाला गती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संकल्पित केलेली आणि २०२३ स्थापन केलेली असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही एक ना-नफा ना-तोटा संस्था असून ही महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी समर्पित आहे. एआयडी नवोन्मेष आणि सहकार्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते, गुंतवणूक संधी सुलभ करण्यासाठी उद्योग आणि धोरणकर्त्यांसोबत जवळून काम करते, उद्योग-विशिष्ट मुद्द्यांसाठी पाठबळ देऊ करते आणि विदर्भाला एक प्रमुख केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देते.
गुंतवणुकीसाठी संभाव्य संधी
या सहकार्याअंतर्गत, दोन्ही संस्था विदर्भात व्यापार प्रोत्साहन आणि गुंतवणुकीसाठी संभाव्य संधी ओळखतील, आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि जगभरात निर्यात आणि आयात वाढवतील आणि व्यापार प्रदर्शने, खरेदीदार-विक्रेता बैठका, व्यवसाय विकास मंच, कार्यशाळा, औद्योगिक मोहिमा आणि ज्ञान-वर्धन कार्यक्रम यासारखे संयुक्त उपक्रम आयोजित
सामंजस्य करारात प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सहकार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी वार्षिक कृती आराखडा आणि पुनरावलोकन यंत्रणेची रूपरेषा देण्यात आली आहे.international trade दोन्ही पक्ष वृत्तपत्रे, सोशल मीडिया आणि मीडिया सहकार्याद्वारे त्यांच्या उपक्रमांची जाहिरात करतील आणि परस्पर उद्दिष्टे मजबूत करण्यासाठी सहाय्य करतील.
व्यापार क्षेत्रात विदर्भाला पाठबळ या प्रसंगी बोलताना, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे या सहकार्यामुळे विदर्भात जागतिक भागीदारी आणि आर्थिक विकासासाठी नवीन मार्ग खुले होतील. जीआयबीएफच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी समन्वय साधून औद्योगिकीकरणाला गती देण्याचा आणि भारताच्या जागतिक व्यापार क्षेत्रात विदर्भाला अधिक पाठबळ देण्याचा आमचा मानस आहे. ही धोरणात्मक भागीदारी मध्य भारतात शाश्वत आणि समावेशक औद्योगिक विकासाला चालना देत ’मेक इन इंडिया’ आणि सुलभता’ उपक्रमांना पुढे एआडी आणि जीआयबीएफच्या सामायिक दृष्टिकोनाला बळकटी देते.