कार रिव्हर्स घेताना भीषण अपघात; ४ वर्षांच्या चिमुकल्याचा चाकाखाली येऊन मृत्यू, VIDEO

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नोएडा, 
noida-car-accident एका हृदयद्रावक अपघातात केवळ चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री सेक्टर 31 मधील ए ब्लॉक परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, कार रिव्हर्स घेताना मागून जात असलेला लहान मुलगा गाडीच्या चाकाखाली आला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
 
noida-car-accident
 
सेक्टर 20 पोलिस ठाण्याचे प्रभारी डी. पी. शुक्ला यांनी सांगितले की, अपघातात सहभागी वाहन आणि चालक दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. कार चालक जयंत शर्मा रिव्हर्स घेत असताना ही दुर्घटना झाली. मुलाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. noida-car-accident चार वर्षांच्या त्या निष्पाप बालकाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पालकांचा आक्रोश पाहून सर्वांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पोलिसांनी सांगितले की, मुलाच्या वडिलांनी आशीष यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची कारही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
सौजन्य : सोशल मीडिया