पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे तात्काळ पंचनामे करा

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
बुलढाणा, 
prataprao-jadhav : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत.
 
 
JK
 
गेल्या आठवड्याभरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस पडत असल्यामुळे या पावसामुळे तूर हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज सकाळी प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत .. शेतकर्‍यांनी सुद्धा आपल्या गावच्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आले आहे.