कृषी साहित्य विक्रेत्यांचा ‘साथी पोर्टल’विरुद्ध कडकडीत बंद

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
यवतमाळ,
Strict against 'Saathi Portal' राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून बियाणे विक्रीसाठी ‘साथी पोर्टल 2’ चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या पोर्टलचा वापर करणे विक्रेत्यांसाठी शक्य नसल्याने या विरोधात आवाज उठवित मंगळवारी यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाने कडकडीत बंद पाळला. अनेक विक्रेत्यांकडे संगणक नसून संगणक प्रशिक्षणही घेतले नाही. कृषी विभागानेही कुठले प्रात्यक्षिक घेतले नाही. तसेच अनेक भागांत नेट कनेक्टिव्हिटी नाही.

Strict against
यामुळे कृषी विक्रेत्यांमध्ये रोष व्यक्त होत असून साथी पोर्टलला विरोध करीत आहेत. आम्हाला ते शक्य नसून या निर्णयाला स्थगिती द्या, अशी मागणी कृषी विक्रेत्यांनी केली आहे. विक्रेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कृषी सेवा केंद्रचालकांनी मंगळवारी कडकडीत बंद पुकारला होता. या बंदमध्ये 1750 विक्रेते सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी साहित्य विक्रेता संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप ओमनवार, जिल्हाध्यक्ष सुरेश मुंधडा, सचिव कौस्तुभ शिर्के, उपाध्यक्ष अभय राऊत, संजय कोषटवार, सतीश कांडूरवार, उदय येरावार, सचिन भरतिया, श्रीपाद येरावार, राम जाजू, हरीष गोपलानी, अरविंद कांडूरवार, गिरीष शेजवाल, गजानन भास्करवार यांची उपस्थिती होती.