कानपूर,
mother-killed-son-kanpur आई या शब्दालाही कलंक लावणारी एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये ममता नावाच्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या एकुलत्या एक मुलाची हत्या घडवून आणली. कारण मुलगा आईच्या अनैतिक प्रेमसंबंधांच्या आड येत होता. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आई ममता आणि तिचा प्रियकर मयंक कटियार यांना अटक केली आहे.
माहितीनुसार, ममताचा पती संदीप कुमार याचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर ती आपल्या गावातील मयंक कटियार या तरुणाच्या संपर्कात आली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ममताचा मुलगा प्रदीप आंध्र प्रदेशात नोकरी करत होता आणि दिवाळी साजरी करण्यासाठी तो घरी आला होता. गावात आल्यानंतर त्याला आई आणि मयंकच्या संबंधांची माहिती मिळाली. त्याने या संबंधांना विरोध दर्शवला. मात्र, ममता आणि मयंक दोघांनाही त्याचा विरोध मान्य नव्हता. या विरोधाचा कायमचा अंत करण्यासाठी दोघांनी प्रदीपची हत्या करण्याची साखळीबद्ध योजना आखली. ममताने आधी प्रदीपच्या नावावर तब्बल ४० लाख रुपयांच्या चार विमा पॉलिसी घेतल्या, जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर मोठी रक्कम मिळू शकेल. हत्या अपघातासारखी दिसावी म्हणून त्यांनी बाजारातून हातोडीही विकत घेतली. २६ ऑक्टोबर रोजी मयंकने आपल्या धाकट्या भावाला, ऋषी कटियारला, प्रदीपला हॉटेलमध्ये जेवायला नेण्याचे सांगितले. mother-killed-son-kanpur परंतु परतीच्या वाटेवर ऋषी आणि मयंकने प्रदीपच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्याची निर्दयपणे हत्या केली. त्यानंतर मृतदेह कानपूर-इटावा महामार्गावरील डेरापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून दिला. २७ ऑक्टोबरच्या सकाळी प्रदीपचा रक्ताने माखलेला मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला. सुरुवातीला पोलिसांना ही घटना अपघात असल्याचा संशय आला. मात्र, प्रदीपच्या आजोबा जगदीश नारायण यांनी पोलिसांना ममता आणि मयंकच्या संबंधांबद्दल माहिती दिली. गावकऱ्यांनीही पोलिस ठाण्यात संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी मयंक आणि ऋषीवर खुनाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी निघालेल्या पोलिसांनी अंगदपुर परिसरात ऋषीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात झालेल्या गोळीबारात ऋषीच्या पायात गोळी लागली आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. mother-killed-son-kanpur त्यानंतर पोलिसांनी मयंकलाही अटक केली आणि खुनासाठी वापरलेली हातोडीही जप्त केली. कानपूर देहातचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश पांडे यांनी सांगितले की, “प्रेमसंबंध आणि विम्याच्या पैशाच्या हव्यासापोटी आई ममताने आपल्या प्रियकर मयंकच्या मदतीने स्वतःच्या मुलाचा खून करवला आहे.” ऋषी कटियारवर यापूर्वीही लूट, चोरी आणि गँगस्टर अॅक्टसारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती त्यांनी दिली.