नवी दिल्ली,
mamta-kulkarni-statement-on-dawood ९०च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये गाजलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी आता संन्यासाचा मार्ग स्वीकारून महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी बनल्या आहेत. मात्र अलीकडे त्यांनी दिलेल्या दाऊद इब्राहिमविषयीच्या विधानामुळे पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.

गोरखपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांनी त्यांना दाऊद इब्राहिमविषयी प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले – “माझा दाऊदशी दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता, पण त्याने ना बॉम्ब ब्लास्ट केला, ना कोणतीही देशविरोधी कृती. देशाच्या आत तो दहशतवादी नव्हता. मी कधीही दाऊदला भेटले नाही.” तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, लोकांनी तिच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी हा दाऊद इब्राहिमच्या समर्थनाचा सूर असल्याचे म्हटले. मात्र, वाद वाढल्यानंतर ममता कुलकर्णीने स्वतःच या विधानावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले, “माझ विधान योग्य प्रकारे ऐकावे आणि साधु-संत विवेकाने समजून घ्यावे. माझ नाव कधीच दाऊदशी जोडलेले नव्हते. mamta-kulkarni-statement-on-dawood काही काळासाठी माझे नाव विक्की गोस्वामीसोबत जोडण्यात आले, पण त्याचही नाव कधी देशविरोधी कृतीमध्ये आले नाही.”
माहितीनुसार, ममता कुलकर्णीचे नाव पूर्वी विक्की गोस्वामी या व्यक्तीसोबत जोडले जात होते. पत्रकार परिषदेत तिने दाऊदऐवजी अप्रत्यक्षरित्या त्याच्याच संदर्भात बोलल्याची चर्चा आहे. mamta-kulkarni-statement-on-dawood ती गोरखपूरच्या पीपीगंज येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात किन्नर अखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी किन्नर यांच्यासह उपस्थित होती. एकेकाळी ग्लॅमर वर्ल्डमध्ये गाजलेली ही अभिनेत्री आता पूर्णपणे धार्मिक जीवन जगत असून, समाजसेवा आणि अध्यात्माच्या कार्यात गुंतली आहे.