वाशीम,
unseasonal rain वाशीम जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण असून, २९ व ३० ऑटोबर रोजी जिल्ह्यातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. सध्या वाशीम जिल्ह्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु आहे. शेतकर्यांनी सोयाबीन कापून त्यांच्या गंज्या शेतात लावल्या आहेत.
मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेताील सोयाबीन गंज्या भिजल्याने त्यातून सोयाबीनला अंकुर येण्याची भिती आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सप्टेंबर व ऑटोबर मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. सततच्या पावसाने सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात बाजारात सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे लागवडीचा खर्चही वसूल होणार नाही, अशी परिस्थिती आहे. ज्या काही शेतकर्यांचे सोयाबीन अतिवृष्टीच्या तडाख्यातून हातात आले. त्याला अवकाळीचा फटका बसत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.unseasonal rain वाशीम जिल्ह्यात ३० ऑटोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पावसाच्या नोंदीच्या आकडेवाडीनुसार वाशीम तालुयात २३.०७ मि.मी, रिसोड तालुयात २.०९ मि.मी., मालेगाव, ८.०२ मिमी, मंगरुळनाथ, ३५.०२ मि.मी, मानोरा ७३.०१ मि.मी, कारंजा तालुयात २७.०९ मि.मी. पावसाची नोंद झाली.