मुख्यमंत्र्यांनी घेतली अरुण अडसड यांची भेट

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |

धामणगाव रेल्वे,
Vidarbha BJP leaders, विदर्भात जनसंघानंतर भारतीय जनता पार्टीचे संघटन शक्ती वाढविणारे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुण अडसड यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अमरावती येथील अरुणोदय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
 

Vidarbha BJP leaders, Arun Adsad, 
विदर्भात भारतीय जनता पक्ष खामगाव ते आमगावपर्यंत वाढविण्यासाठी अरुण अडसड यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी घराघरात भाजप पोहोचविला. १९९५ मध्ये भाजप युतीच्या काळात अरुण अडसड हे विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना विदर्भातील अनेक रस्ते व प्रकल्प मार्गी लावले होते. ते आमदार असताना विविध मागण्या व प्रश्न विधानसभेत मांडून मंजूर करून घेतले होते. गुरूवारी राज्याचे मुख्यमंत्री फडवणीस यांनी अमरावती येथील अरुणोदय निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये वीस मिनिट चर्चा झाली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर, आ. प्रताप अडसड, आ. राजेश वानखडे, आ. रवि राणा, आ. प्रवीण तायडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, रविराज देशमुख, प्रतिभा अडसड, रावसाहेब रोठे, अर्चना