मतदार यादीतील घोळ संपवा त्यानंतर स्था.स्व. निवडणूका घ्या

उबाठा प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेळके

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
बुलढाणा,
Jayashree Shelke : बुलढाणा मतदार संघातील बुलढाणा व मोताळा तालुक्यात मतदार यादीत गेल्या १५ वर्षापासून मयत मतदारांची हजारो नावे समाविष्ट आहे. याशिवाय दुबार मतदार नावे तसेच एकाच गावातील एका घरक्रमांकावर शंभराहून अधिक नावे नोदविण्यात आली आहे. यासंदर्भात विधानसभा निवडणूकी नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. मात्र प्रशासनाने सहकार्य केले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूका घेण्यापूर्वी मतदार यादीतील घोळ संपवा तसेच मयत व दुबार मतदारांच्या नावासमोर रद्दचा शिक्का मारा निपक्षपणे लोकशाही मार्गाने निवडणूका घ्याव्यात अशी माहिती पत्रकार परिषदेत उबाठा सेनेच्या प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी दिली.
 
 
 

VGSDG
 
 
 
दि. ३० ऑक्टोबर रोजी हॉटेल रामा ग्रॅण्डच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला उबाठाचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, डी. एस. लहाने, नारायण हेलगे, लखन गाडेकर व पदाधिकारी उपस्थित होते. जयश्री शेळके यांनी सांगितले की, बुलढाणा विधानसभा मतदार संघातील ७ हजार ४०० मतदारांची मयत नोंदणी झाली आहे. मोताळा तालुक्यातील निपाणा या गावी अकराशे २६ मतदार संख्या आहे. त्यातील १३२ नावे मयत मतदारांची आहे. बुलढाणा तालुक्यातील मतदार यादी क्रमांक २६१ मध्ये सुद्धा १५ वर्षापूर्वी मयत झालेल्यांची नावे समाविष्ट आहे.
 
 
विधानसभा निवडणूकीत बोगस मतदान झाले त्यामुळेच उमेदवाराचा निसटता विजय झाला. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. परंतू प्रशासनाने सहकार्य केले नाही असे आरोप करीत येणार्‍या निवडणुकांमध्ये मतदार यादीचा घोळ निवडणूक विभागाने दुर करावा असे आवाहन त्यांनी केले. यासंदर्भात रितसर आक्षेप नोंदविण्यात आल्याचे सुद्धा त्यांनी आर्वजून सांगितले. डी. एस. लहाने यांनी माहिती देतांना सांगितले बुलढाणा तालुक्यातील सागवन गावच्या मतदान यादीत १६१ नावे एकाच घराचा क्रमांक देऊन नोंद करण्यात आली. अनेक मतदारांची नोंद सुद्धा घेण्यात आली. दुबार मतदार नोंदणी क्रमाकांचा घोळ यादीत कायम आहे. निवडणूकी पूर्वी हा घोळ दुर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.