शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा

*सर्वपक्षीयांची तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
समुद्रपूर,
farmers-satbara : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्रमी दर कपातीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कर्जमुती व शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्य व शेतकर्‍यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
 
 
J
 
यावर्षी अस्मानी संकटाने शेतकर्‍यांची कंबर मोडली आहे. जिल्ह्यात यंदा तीनवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांसह शेतजमिनीही खरडून गेल्या. सोयाबीन हातचे गेले, कपाशीची स्थितीही गंभीर आहे. असे असताना मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोर धरला. त्यामुळे उर्वरित पिकेही धोयात आली आहेत. सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी २८ रोजी पासून बच्चू कडू यांनी नागपूर येथे शेतकरी आंदोलन पुकारले आहे.
 
 
राज्यातील सर्व शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा हे महायुती सरकारने दिलेल्या जाहिरनाम्यातील आश्वासन पूर्ण करावे, सोयाबीन खरेदीसाठी ग्रेडिंगप्रमाणे दर ठरविताना अ, ब, क श्रेणीमधील दरात फार तर १०० ते २०० एवढाच फरक ठेवावा, कोणत्याही श्रेणीचा माल शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात विकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, कापूस, सोयाबीन, धान आदी शेतमाल खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.