घोराड,
Wardha-unseasonal rain : सततच्या पावसामुळे सोयाबीन हातातून गेले. कापसाची स्थितीही वेगळी नाही. असे असतानाच बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे तुरीचे पीक धोक्यात येणार असल्याची शक्यता शेतकर्यांनी वर्तविली आहे.
सेलू तालुयातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचा पेरा केला आहे. तुरी बहरल्या असून बहुतांश तुरीचे पीक फुलोरा अवस्थेत आहे. काही दिवसांनी त्याचे चलपामध्ये रुपांतर होण्याची प्रतीक्षा असताना आलेल्या मुसळधार पावसामुळे फुल गळतीची शयता नाकारता येत नाही. फुलगळ झाल्यास तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यास शेतकर्यांचे सोयाबीन पाठोपाठ तुरीमुळे आर्थिक कंबरडे मोडले जाणार आहे.
शेतकर्यांनी जवळपास तूर पिकावर एकरी २५ हजार रुपये खर्च केला आहे. अजूनही तुरीवर दोन फवारणीची आवश्यकता असताना सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.