Yavatmal heavy rainfall, यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयासह अनेक तालुक्यांना बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार दणके देणे सुरू केले आहे. बुधवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारच्या दुपारपर्यंत मुळीच विश्रांती घेतलेली नव्हती. जिल्हाभरात अनेक शेतांमध्ये सोयाबीन व कापूस काढून ताडपत्रीने झाकून ठेवलेला आहे. या पिकाला वरून संरक्षण असले तरी बुधवारी रात्रीच्या जोरदार पावसाने खालच्या बाजूने पार भिजवून टाकले आहे. यापूर्वी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होऊन गेले आहेत. आता या नवीन नुकसानाचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकèयांची अपेक्षा आहे.
उमरखेड तालुक्यात बुधवार, 29 ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरुवार, 30 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंतही सुरूच होता. सलग पावसामुळे शहर व परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील ओढे, नाले वाहू लागले असून काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत.
शेतकèयांसाठी हा पाऊस चिंतेचा विषय ठरत आहे. सोयाबीन व कापूस पिकांच्या काढणीच्या हंगामात झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही शेतकèयांनी काढलेला माल उघड्यावर असल्याने तो भिजून खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नगर परिषद आणि महसूल प्रशासनाकडून पावसाची स्थिती लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही कमी उंचीच्या भागात पाणी साचल्याने नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच विविध नैसर्गिक संकटांचा सामना करणाèया शेतकèयांच्या अडचणी परतीच्या पावसाने अधिकच वाढवल्या आहेत. ऐन काढणीच्या वेळी महागाव तालुक्यात मुसळधार परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याही परिस्थितीत शेतातील सोयाबीन, कापसावर शेतकरी आशा लावून बसला होता. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात होती, काही ठिकाणी कापूस वेचणीला आला होता. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर महागाव तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. शेतात काढणी करून ठेवलेले सोयाबीन पावसाच्या तडाख्याने पूर्णपणे भिजले आहे. भिजलेल्या सोयाबीनला जागेवरच कोंब फुटण्याचे प्रकार घडत असून दाणे काळे पडत आहेत. यामुळे सोयाबीनची गुणवत्ता घसरली असून, उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने उभी पिकेही पाण्याखाली गेली आहेत.
या पावसामुळे कपाशीचे तर अधिकच नुकसान झाले आहे. वेचणीला आलेला पांढरा कापूस पूर्णपणे भिजल्यामुळे खराब झाला आहे. सततच्या पावसामुळे सरकीला कोंब फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. ओल्या कापसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, परिणामी शेतकèयाला अपेक्षित भाव मिळणार नाही. काही ठिकाणी वाèयामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत.या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे, सुरुवातीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे उत्पन्न घटले आहे, त्यात आता परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीकही वाया गेले आहे. महागडी खते आणि बियाणे वापरून केलेली पेरणी वाया गेल्यामुळे गुंतवलेला पैसाही निघणार नाही, अशी भीती शेतकèयांना आहे.
अनेक शेतकèयांचे आर्थिक नियोजन या खरिपाच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यात सणासुदींच्या दिवसांत झालेल्या नुकसानामुळे त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाची तीव्रता पाहता शेतकरी पूर्णतः खचला आहे. शेतकèयांनी तातडीने पंचनामे करून शासकीय मदत त्वरित देण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टी, अनुदानातील विलंब आणि आता परतीचा पाऊस या तिहेरी संकटामुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
सध्या तरी, अस्मानी संकटांचा हा घाला कधी थांबतो आणि शासनाकडून मदतीचा हात कधी मिळतो, याकडेच तालुक्यातील शेतकरी डोळे लावून बसले आहेत.