'त्या' क्षणांवेळी त्रास देत होती प्रेयसीची मुलगी, प्रियकराने मारहाण करून केली हत्या

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
बंगळुरु, 
boyfriend-killed-girlfriends-daughter बंगळुरुमध्ये अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या सात वर्षांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण इतकंच की, ती लहान मुलगी त्याच्या खासगी क्षणांत व्यत्यय आणत होती. केवळ या कारणावरून २६ वर्षीय आरोपीने निर्दयीपणे त्या निरागस मुलीचा जीव घेतला आणि घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, कुंबळगुड्डू पोलिसांनी तक्रार आल्यानंतर शोधमोहीम हाती घेतली आणि अखेर आरोपी दर्शनकुमार यादव याला तूमकूरू रोड परिसरातून अटक करण्यात आली.
 
boyfriend-killed-girlfriends-daughter
 
वृत्तानुसार, मृत मुलगी सरकारी शाळेत दुसरीत शिकत होती. ती आपल्या आई आणि आजीसोबत राहत होती. तिची आई एका खासगी कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत असून, बराच काळ पतीपासून वेगळी राहते आहे. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख पेंट कंपनीत काम करणाऱ्या दर्शन नावाच्या तरुणाशी झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात आजीच्या निधनानंतर आरोपीला त्या मुलीची उपस्थिती अडचणीची वाटू लागली. त्याने मुलीला वसतिगृहात पाठवण्याचा दबाव आणला, मात्र आईने त्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद आणि भांडणं सुरू झाली. boyfriend-killed-girlfriends-daughter पीडित आईच्या म्हणण्यानुसार आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करत असे आणि आई-मुलीला मारण्याच्या धमक्या देत असे.
२३ ऑक्टोबरच्या रात्री आरोपी आपल्या प्रेयसीच्या घरी राहिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाहेर गेल्याचे सांगून मुलीला आपल्या घरी घेऊन गेला. boyfriend-killed-girlfriends-daughter त्यानंतर संध्याकाळी त्याने आईला फोन करून घरी लगेच यायला सांगितले. आई घरी आल्यानंतर आरोपीने तिच्यावर हल्ला केला आणि एका खोलीत बंद केले. ती बाहेर पडली तेव्हा तिच्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांच्या मते, आरोपीने त्या लहान मुलीचा गळा चिरून निर्दयपणे खून केला होता.