सहयोग सोसायटीत सुरेल दिवाळी पहाटेचा जल्लोष

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Sahayog Society त्रिमूर्ती नगर येथील सहयोग एन.आय.टी. हाउसिंग सोसायटीच्या प्रांगणात सुरेल वातावरणात “दिवाळी पहाट” साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वरनिल ग्रुपचे निर्माते गायक निलेश सावरकर, गायिका सायली डाहाळकर, निवेदक सतीश होरे, तबलावादक सुधीर आमनेर व सर्वेश सावरकर (वय ९), सिंथेसायझर वादक हर्षद मौदेकर, ऑक्टोपॅड वादक शिवा सरोदे आणि साउंड सिस्टीमवर नितीन विंचुरकर यांनी सादरीकरणात सहभाग घेतला.
 
Sahayog Society
सोसायटीतील गायक अंजली कदम, प्रशांत घुरुडे, राकेश जवंजाळ आणि डॉ. हाडके यांनीही एकापेक्षा एक अशी गाणी सादर करून रंगत वाढवली. “सुर निरागस हो”, “सुनो सजना”, “आई भवानी तुझ्या कृपेने” यांसह हिंदी-मराठी गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. Sahayog Society कार्यक्रमाला दिनेश केदारे आणि पुराणिक गुरुजी यांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजनात राकेश जवंजाळ, प्रसन्ना रोडी, मनोज पांडे, विलास दुपारे, मनोज कदम, रामदास खंडाते, नितीन रेवतकर, रविंद्र बाळबुधे, स्वप्निल मिरे, प्रशांत घुरुडे, हर्षद फडके आणि मनोज धोटे यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: सपना रोडी, संपर्क मित्र