नवजात बाळाची विक्री करणाऱ्या आराेपीला दणका

- उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
accused-of-selling-newborn-baby पैशांचे आमिश दाखवून गरजू महिलांना फसवून त्यांच्या नवजात बाळांची विक्री करून लाखाेंनी दलाली मिळविणाऱ्या टाेळीतील आराेपी सचिन रमेश पाटील याला उच्च न्यायालयाने दणका दिला दिला आहे. उच्च न्यायालयाने आराेपीविरुद्ध सारख्या सात गुन्ह्यांची नाेंद असून त्याला जामिनावर साेडल्यास ताे पुन्हा बाळांची विक्री करण्याचे गुन्हे करु शकताे, अशी शक्यता व्यक्त केली व जामीन फेटाळून लावला. हा आदेश न्यायमूर्ती वृषाली जाेशी यांनी दिला.
 
 
accused-of-selling-newborn-baby
 
प्रकरणातील मुख्य आराेपी श्वेता सावळे ऊफर् आयेशा मकबूल खान असून, तिच्यासह सचिन पाटील आणि इतर आराेपींविरुद्ध काेराडी पाेलिसांनी भारतीय दंड संहिता, बाल न्याय कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकाेका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एएचटीयूच्या तत्कालिन सहायक पाेलिस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी या गुन्ह्याचा तपास केला हाेता. गेल्या तीन वर्षांपासून हे आराेपी मध्यवर्ती कारागृहात आहेत. सचिन पाटीलने उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली. त्यावर सुनावणीनंतर न्यायालयाने निरीक्षण नाेंदवत म्हटले की, अशा गंभीर आणि अमानुष कृत्यात सहभागी असलेल्या व्यक्तीला जामिनावर मुक्तता देणे उचित ठरणार नाही. accused-of-selling-newborn-baby पाेलिसांनी आराेपींची चाैकशी केली असता, पाटीलने एका गर्भवती महिलेला फसवून आयेशा खानकडे आणले. त्यानंतर त्या महिलेचे नवजात बाळ संताेष आणि मीना या दाम्पत्याला विकण्यात आले, अशी माहिती िफर्यादीकडून देण्यात आली. न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण हाेते. त्यामुळे आराेपीला जामीन देणे याेग्य नाही. आयशा खान ही बाळ विक्री करणाऱ्या टाेळीची म्हाेरक्या असून तिने आतापर्यंत जवळपास 50 पेक्षा जास्त नवजात बाळांची विक्री केल्याची शक्यता आहे.