नागपूर,
Amla Ashtami महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआउट येथे आवळ्याच्या झाडाखाली आवळी अष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. मधुबन मैत्रिणींनी आवळ्याचे पूजन करून फुलवात, टिपूर लावून आरती केली. ९२ वर्षीय प्रतिभा पुरोहित यांनी आवळी अष्टमीचे महत्त्व सांगितले. पावसामुळे प्रांगणातील कार्यक्रम हॉलमध्ये हलवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी एकत्र डब्बा पार्टीचा आनंद घेतला.
 
डब्यात आवळ्याची चटणी, लोणचं, भाजी, धिरडं, मसालेभात, जिलबी, लाडू, चकली, शेव, दहीभात अशा विविध पदार्थांचा समावेश होता. Amla Ashtami कार्यक्रमासाठी मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे व अनंता पंडीत यांनी हॉल उपलब्ध करून सहकार्य केले.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र