विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणकीय विचारसरणीचे अभ्यासक्रम

२०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून नवा उपक्रम

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
- शिक्षक प्रशिक्षण डिसेंबर २०२५ पर्यंत होणार पूर्ण
नागपूर : शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले की, शालेय स्तरावर इयत्ता तिसरीपासून कृत्रिम Artificial Intelligence and Computing Courses बुद्धिमत्ता आणि संगणकीय विचारसरणी या विषयांचा समावेश करण्यात येणार आहे. हा नवा अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून देशभरातील शाळांमध्ये लागू होणार आहे. हा निर्णय राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम चौकट २०२३ (एनसीएफ-एसई) आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० यांच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या हितधारक बैठकीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी), केंद्रीय विद्यालय संघटन (केव्हीएस) आणि नवोदय विद्यालय समिती (एनव्हीएस) यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या बैठकीत अभ्यासक्रमाच्या रचना, अंमलबजावणी व शिक्षक प्रशिक्षणासाठीचा रोडमॅप निश्चित करण्यात आला.
 
 
 

Aii
“AI म्हणजे सार्वत्रिक कौशल्य”
संजय कुमार यांचे प्रतिपादन
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले, “कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण हे केवळ तांत्रिक नसून, जगाशी निगडित एक मूलभूत आणि सार्वत्रिक कौशल्य मानले पाहिजे. हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक, विद्यार्थी-केंद्रित आणि अनुभवाधारित असावा.”
Artificial Intelligence and Computing Coursesनव्या अभ्यासक्रमात एआय आणि सीटीचे घटक नसीएफ-एसई अंतर्गत समाविष्ट करण्यात येतील. यासाठी वेळापत्रक, डिजिटल व पुस्तकाधारित शैक्षणिक साधने आणि शिक्षक प्रशिक्षण मॉड्यूल तयार केले जाणार आहेत. शिक्षक प्रशिक्षण ‘निष्ठा’ या राष्ट्रीय प्रशिक्षण आराखड्याच्या माध्यमातून घेतले जाईल. ही सर्व सामग्री आणि प्रशिक्षण प्रक्रिया डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आयआयटी मद्रासचे डॉ. कार्तिक रमन समिती अध्यक्ष
सीबीएसई ने या नव्या अभ्यासक्रमाची आखणी करण्यासाठी आयआयटी मद्रासचे डॉ. कार्तिक रमन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती एआय आणि सीटीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार सुलभ व प्रायोगिक बनविण्याचे काम करणार आहे. शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, शिक्षकांची तयारी आणि सर्वसमावेशक शिक्षणाची अंमलबजावणी हे या उपक्रमाच्या यशाचे प्रमुख घटक असतील. या निर्णयामुळे शालेय शिक्षण प्रणालीत डिजिटल कौशल्यांची नवी दिशा निर्माण होणार असून, भारतातील विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या नव्या युगासाठी अधिक सक्षम बनतील.