सरकारचा मोठा निर्णय: शालेय अभ्यासक्रमात AI समाविष्ट

तिसऱ्या वर्गापासून शिक्षण सुरु होणार

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली
artificial intelligence in schools केंद्र सरकारने शालेय शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, देशभरातील सर्व शाळांमध्ये तिसऱ्या वर्गापासून AI शिकविण्यात येणार आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल.
 
 

artificial intelligence in schools 
सरकारने सांगितले आहे की, या देशव्यापी योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भविष्यातील डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी तयार करणे आहे. नवीन पिढी तंत्रज्ञान सहज आत्मसात करते, आणि AI शिकवणे हा विद्यार्थ्यांसाठी एक मोठा संधीचा मार्ग ठरेल, असा सरकारचा विश्वास आहे.अभ्यासक्रमाची रचना IIT मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल. या समितीचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना AI ची मूलभूत संकल्पना समजावणे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवणे आणि शालेय शिक्षणात AI चा समावेश करणे हा आहे.
 
 
 
या योजनेअंतर्गत artificial intelligence in schools जवळपास एक कोटी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांनीच विद्यार्थी AI शिकवण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करावे लागणार आहे. सध्या सीबीएसईच्या १८,००० पेक्षा जास्त शाळांमध्ये काही वर्गांसाठी AI आधारित विषय शिकवले जात आहेत.तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे AI या नव्या संकल्पनेचे महत्त्व वाढले आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मते, विद्यार्थ्यांना AI शिकवणे हा आधुनिक शिक्षणाचा भाग असून भविष्यातील नोकऱ्या, संशोधन आणि उद्योगक्षेत्रात यांचा मोठा उपयोग होणार आहे.
 
 
 
 
याशिवाय, Jio कंपनीने देखील फ्री ‘AI Classroom’ कोर्स लाँच केला आहे. या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना AI ची मूलभूत माहिती, विविध साधने आणि त्यांचा वापर याबद्दल शिकवले जाईल. या प्रयत्नातून शालेय विद्यार्थ्यांना AI शी परिचित करून देण्याचे काम करण्यात येणार आहे.शिक्षणतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे लहान मुलांपासूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.