वर्धा,
bird lovers meeting अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित द्वि दिवसीय महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाकरिता वर्धेतील बहार नेचर फाउंडेशनच्या १२ सदस्यांनी अमरावतीकडे सायकलने प्रस्थान केले. पर्यावरण जनजागृतीसाठी निघालेल्या या सायकलवारीत बहारचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, सचिव जयंत सबाने, राजदीप राठौर, दर्शन दुधाने, अतुल शर्मा, सुषमा शर्मा, मनेशकुमार सज्जन, डॉ. लोकेश तमगिरे, अॅड. प्रसाद सोईतकर, हेमंत धानोरकर व अमोल मुनेश्वर हे सायकलपटू सहभागी झाले आहेत.
 
 
 
  
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकातून निघालेल्या या सायकलवारीला जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहारचे उपाध्यक्ष दीपक गुढेकर, डॉ. आरती प्रांजळे घुसे, रवींद्र कडू, आशा घेवडे, विनोद सामक, अरविंद सरदार, निवास उरकुडे, याकूब शेख, अंजुमन शेख, सुरज बोदिले, पल्लवी बोदिले, मनोज अस्वले यांच्यासह बहारचे सदस्य व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आगामी प्रवासाच्या सदिच्छा देत निरोप दिला.bird lovers meeting या प्रवासादरम्यान पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत संवाद साधत ही चमू  १ नोव्हेंबरला संमेलनस्थळी पोहोचणार आहे. या संमेलनात बहारचे पदाधिकारी तथा युवा वैज्ञानिक दर्शन दुधाने हे पक्ष्यांचे प्रजनन जीवशास्त्र या विषयाची मांडणी करणार आहेत.