प्राचीन श्री शिव मंदिरात आंवळा नवमी उत्साहात साजरी

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Bellyshop Motibag Railway Colony बेलिशॉप मोतीबाग रेल्वे कॉलनीतील प्राचीन श्री शिव मंदिरात दीपावलीनंतर येणारी आंवळा नवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मंदिर परिसरातील आंवळा वृक्षाखाली अनेक महिलांनी आपल्या कुटुंबासह पूजन करून व्रत साजरे केले.
 

av  
 
महिलांनी आंवळा वृक्षाची पूजा करून प्रसादाचे भोजन घेतले. या प्रसंगी मंदिर परिसरातील प्रस्तावित सौंदर्यीकरण कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी केले. Bellyshop Motibag Railway Colony कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पं. कृष्ण मुरली पांडे, प्रकाश राव (गुंडू राव), पी. सत्याराव, डॉ. संजय मालवीय, डॉ. प्रवीण डबली, रामकृष्ण पटनायक, प्रेमलाल यादव, राजकुमार सहनिया, गणेश कोतुलवार, सी. राजगोपाल, तसेच महिला मंडळ सदस्य आणि मंदिर समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र