अमेरिकेला मोठा धक्का, भेटीनंतर शी जिनपिंग यांनी ट्रम्पचा दावा फेटाळला

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
बुसान, 
xi-jinping-rejects-trumps-claim अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गुरुवारी दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेली बैठक आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. ट्रम्प यांनी या बैठकीचे वर्णन “अत्यंत यशस्वी” असे करत ती १० पैकी १२ गुणांची असल्याचे सांगितले. परंतु आता शी जिनपिंग यांनी केलेल्या विधानामुळे या भेटीचे वेगळेच राजनैतिक अर्थ उलगडू लागले आहेत.
 
 
xi-jinping-rejects-trumps-claim
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांचा तो दावा फेटाळला आहे ज्यात त्यांनी म्हटले होते की, चीन कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी नाही. xi-jinping-rejects-trumps-claim बुसानमध्ये झालेल्या शिखर परिषदेत जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या गाझा युद्धविराम प्रयत्नांचे कौतुक केले, मात्र थायलंड-कंबोडिया शांतता चर्चेबाबत त्यांच्या दाव्याला स्पष्टपणे नकार दिला. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना सांगितले की बीजिंग दोन्ही आग्नेय आशियाई शेजारी देशांना त्यांच्या सीमावादाचा तोडगा “स्वतःच्या मार्गाने” काढण्यासाठी मदत करत आहे. थायलंड आणि कंबोडिया यांच्यात वाढलेल्या तणावानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बंद दरवाजामागे बैठक घेतल्याचे समोर आले आहे, ज्यातून चीनचा अप्रत्यक्ष सहभाग स्पष्ट होतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आशिया दौऱ्यात मलेशियामध्ये थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ‘शांती करार’ जाहीर केला होता आणि त्याला “ऐतिहासिक” संबोधले होते. परंतु थायलंडचे परराष्ट्र मंत्री सिहासक फुआंगकेटकाओ यांनी याला “शांती करार” म्हणण्यास नकार देत तो फक्त “शांतीकडे जाणारा मार्ग” असल्याचे म्हटले.
 
थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील वादाचा केंद्रबिंदू म्हणजे प्राचीन प्रीह विहार मंदिर. १९५४ मध्ये फ्रान्सपासून स्वतंत्र झाल्यानंतर थायलंडने या मंदिरावर दावा सांगितला आणि ताबा घेतला. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निकाल दिला, परंतु सीमारेषेवरचा तणाव कायम राहिला. २००८ मध्ये युनेस्कोने या मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा चकमकी सुरू झाल्या. xi-jinping-rejects-trumps-claim २०२५ पर्यंतही या सीमारेषेवर अधूनमधून गोळीबार आणि जीवितहानी होत असून, दोन्ही देश सुमारे ८०० किलोमीटरची सीमा शेअर करतात. या पार्श्वभूमीवर बुसानमध्ये झालेली ट्रम्प-जिनपिंग भेट ही केवळ राजनैतिक सौजन्य नसून, आग्नेय आशियातील बदलत्या समीकरणांची झलक देणारी ठरली आहे.