नागपूर, 
dr pankaj chande कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांना नुकताच इंचगिरी रसाळ संप्रदास  ट्रस्ट, क्षेत्रासंतभूमीद्वारे उच्च शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी विद्याभूषण पुरस्काराने नुकतेच गौरवान्वित करण्यात आले. पांडुरंग महाराज रसाळ, डॉ. दिनेश रसाळ, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. राजाराम शुक्ल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
  
 
डॉ. पंकज चांदे यांनी 15 वर्षे कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरूपद सांभाळले. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे योगदान संस्मरणीय आहे. त्यांनी शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधन, प्रकाशन अशा विविध स्तरांवर विविध योजना राबविल्या. सर्वसामान्यांना संस्कृत आपलेसे वाटेल यासाठी सर्वजनांकरिता संस्कृत अभ्यासक्रम सुरू केले. आर्थिकदृष्टया स्वावलंबी कालिदास संस्कृत विद्यापीठ हे भारतातील एकमेव संस्कृत विद्यापीठ  आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, असामान्य प्रशासकीय कौशल्य, प्रगाढ पांडित्य व अचाट कर्तृत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होत.dr pankaj chande यापूर्वी डॉ. चांदे यांना संस्कृत व उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता राष्ट्रपती पुरस्कार, कुलपतिभूषण उपाधी, महाराष्ट्र सरकारचा कालिदास संस्कृत साधना पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारतीय विद्यापीठ संघाचे अध्यक्षपदही डॉ. चांदे यांनी भूषविले होते. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, विद्यापीठ परिवाराने डॉ. चांदे यांचे अभिनंदन केले आहे.