“रोहित आर्याचा एन्काऊंटर करणारे पोलिस अधिकारी अमोल वाघमारे कोण आहेत?”

मुंबईत ऑडिशन स्टुडिओमध्ये शंभर मुलांना बंधक ठेवणारा व्यक्ति

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Encounter of Rohit Arya मुंबईच्या पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये गुरुवारी घडलेली धक्कादायक घटना राज्यभरात खळबळ उडवून लावणारी ठरली. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने या स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या शंभर मुलांपैकी १७ जणांना ओलीस ठेऊन इतरांना घरी पाठवले, मात्र मुलांना जेवायला बाहेर येण्यासही वेळ दिला नाही. यामुळे परिसरात घाबरलेल्या पालकांची आणि सामाजिक माध्यमांवरून खळबळ उडाली.
 

Encounter of Rohit Arya  
घटनेची माहिती मिळताच Encounter of Rohit Arya  पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. स्टुडिओच्या चारही बाजूंना पोलिसांनी वेढा टाकून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला दीड ते पावनेदोन तास पोलिसांनी रोहित आर्याशी फोनवर संवाद साधून त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कोणत्याही परिस्थितीत ऐकण्यास तयार नव्हता.शेवटी, पोलिसांनी दुसऱ्या बाजूने उंच शिडी आणून बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. पोलीस अधिकारी अमोल वाघमारे यांनी आत प्रवेश करताच रोहित आर्या शस्त्र काढण्याच्या तयारीत होता, ज्यामुळे मुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता स्पष्ट होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाघमारे यांनी गोळीबार केला. यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकारी Encounter of Rohit Arya अमोल वाघमारे गेल्या महिन्यात पवई पोलीस ठाण्यात रुजू झाले असून ते QRT कमांडो टीमचे सदस्य आहेत. त्यांनी कमांडो ट्रेनिंग घेतल्यामुळे या प्रकारच्या तातडीच्या ऑपरेशनसाठी त्यांना परवाना देण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या उंच शिडीच्या मदतीने बाथरूमची काच फोडून आत प्रवेश करून त्यांनी मुलांना सुरक्षित बाहेर काढले.रोहित आर्या हा एका वेब सीरिजच्या चित्रिकरणासाठी या स्टुडिओमध्ये गेल्या पाच दिवसांपासून होता. गुरुवारी चित्रिकरणाचा सहावा दिवस होता आणि त्यादरम्यान शंभर मुलांना ऑडिशनसाठी बोलावले गेले. मात्र काही मुलांना ओलीस ठेऊन, वेळेवर जेवायला न दिल्यामुळे ही धक्कादायक घटना समोर आली.या घटनेने पालकांमध्ये भीती निर्माण केली असून, पोलीस यंत्रणेकडून त्वरित उपाययोजना केली गेल्याने मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ही कारवाई अत्यंत तातडीने आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी केली गेली होती.