यवतमाळ,
  Four people died on the spot  वणी घुग्गुस मार्गावर शुक्रवारी एक ह्रदयद्रावक अपघात घडला, ज्यात एका कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात जन्नत सेलिब्रेशन हॉलपासून काही अंतरावर घडला. प्राथमिक माहितीनुसार, रियाज शेख (वय ५४) यांनी त्यांच्या मुलींना कार चालवायला शिकवताना हा दुर्देवी प्रसंग घडला.
 
माहितीनुसार, रियाज Four people died on the spot  शेख हे वणीतील लालपुलिया परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिक ट्रक दुरुस्ती व्यवसायाचे मालक होते. ते आपल्या मुली मायरा शेख (वय १७), अनिबा (वय ११), झोया (वय १३) यांना कार चालवायला शिकवत होते. अपघाताच्या वेळेस, मुलीने कारवर नियंत्रण गमावले; ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबल्यामुळे कार महामार्गाच्या विरुद्ध दिशेने उसळून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण धडकेत कारचा समोरील भाग चक्काचूर झाला.अपघातात रियाज शेखसह त्यांच्या तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर रियाज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये रियाज यांच्या भावाच्या मुलाचा देखील समावेश आहे. मृतांच्या नावात मायरा शेख, अनिबा, झोया आणि रियाज यांचा समावेश आहे.
या घटनेनंतर वणी शहरात शोककळा पसरली असून, परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि तपास सुरु केला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, अपघाताच्या कारणांचा सखोल अभ्यास सुरू आहे.