घुसर जि.प गटाच्या आरक्षणाला अंतिम मंजुरी मिळणार

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
अकोला,
Ghussar community अकोला-जिल्हा परिषदेच्या घुसर गट आणि गण व आपातापा गणातही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळणे कठीण असल्याने या गटाचे आरक्षण बदलण्यात यावे, असा आक्षेप विभागीय आयुक्तांकडे नोंदवण्यात आला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. आता आरक्षणाला अंतिम मंजुरी आज ३१ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे.
 

Ghussar community  
जिल्हा परिषदेचे ५२ Ghussar community गट व पंचायत समितीच्या १०४ गणांचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले आहे. त्यांपैकी पिंजर गट, घुसर गट आणि त्यातील गणांवर आक्षेप घेण्यात आले.त्यावर मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी पार पडली. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर गट हा आधी सर्वसाधारण महिलेसाठी होता. आताही सर्वसाधारण महिलेसाठी आहे, ते आरक्षण बदलावे, अशी मागणी आक्षेपात करण्यात आली तर घुसर गट आणि त्याअंतर्गत घुसर व आपातापा गणही अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.या गटात कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातींची जातवैधता मिळणे अवघड आहे. त्यामुळे या गट आणि त्यातील गणांचे आरक्षण बदलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये काय फेरबदल होतो, हे आज समजणार आहे.