मेरठ

मिळालेल्या माहितीनुसार, सरूरपूर परिसरातील या व्यक्तीचा बराच काळ आपल्या नातेवाईकांबरोबर मालमत्तेवरून वाद सुरू होता. पीडिताचा आरोप आहे की त्याचे नातेवाईक त्याच्या पत्नीच्या माहेरच्या मालकीच्या घर आणि जमिनीवर बेकायदेशीररीत्या कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते. या वादामुळे घरात रोज भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण होत होते. एवढेच नव्हे, तर विरोधकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता, जेणेकरून नंतर त्याची पत्नी आणि मुलांना खोट्या प्रकरणात अडकवून मालमत्तेवर ताबा मिळवता येईल. या सततच्या तणावाने त्रस्त होऊन त्या व्यक्तीने अखेर असा निर्णय घेतला, ज्याने सगळ्यांना थक्क केले. गावातील लोकांच्या उपस्थितीत त्याने स्वतःच्या पत्निचा विवाह दुसऱ्या तरुणाशी लावून दिला. दोन्ही पक्षांची संमती घेऊनच हा निकाह करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. meerut-viral-news विवाह नंतर त्या व्यक्तीने आपल्या तिन्ही मुलांनाही त्या नव्या पतीच्या स्वाधीन केले.
यानंतर पीडिताने पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन स्पष्ट केले की त्याला या नव्या नात्याबद्दल काहीही आक्षेप नाही आणि त्याच्या माजी पत्नी व तिच्या नव्या पतीच्या सुखी संसारासाठी तो शुभेच्छा देतो. meerut-viral-news तसेच, भविष्यात कोणीही त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत सरूरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय शुक्ला यांनी सांगितले की हा पूर्णतः दोन्ही बाजूंच्या संमतीने झालेला विवाह आहे. सध्या कोणताही वाद नाही, मात्र कोणीही या प्रकरणात अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कठोर पाऊल उचलतील.