वैमानिकांच्या ’मिडनाइट ड्यूटी’च्या वेळेत वाढ

नवीन बदल १ नोव्हेंबरपासून लागू होणार

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नागपूर,
pilots midnight duty वैमानिकांच्या ’मिडनाइट ड्यूटी’च्या गणनेत बदल करण्यात असून १ नोव्हेंबरपासून ही सुधारणा लागू होणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे. सतत दोन रात्री उड्डाण करणार्‍या वैमानिकांच्या ’मिडनाइट ड्यूटी’च्या गणनेत बदल करण्यात आल्याने वैमानिकांची मध्यरात्रीची ड्यूटी पहाटे ५ ऐवजी ६ वाजेपर्यंत मोजली जाईल.
 
 

airoplane 
 
 
या बदलानुसार वैमानिकांना त्यांच्या एकूण १० तासांच्या फ्लाइट ड्यूटी टाइममध्ये आता १२ ते १.५५ आणि पहाटे ५ ते ६ वाजेदरम्यान सेवा देण्याची मुभा असेल. त्यामुळे वैमानिक आता तिसरी लँडिंगही करू शकतील. यापूर्वी मिडनाईट अव्हर्समध्ये केवळ दोन लँडिंगपुरती मर्यादा होती. नव्या नियमानुसार वैमानिकाने सलग दोन रात्री उड्डाण केले असेल, तर त्याला ४८ तासांची अनिवार्य विश्रांती कालावधी मिळेल. जर ड्यूटी सतत रात्रीची तर पूर्वीप्रमाणेच १४ तास ४५ मिनिटांचा विश्रांती कालावधी लागू राहील. ड्यूटीदरम्यान वेळेत उड्डाण न झाल्यास किंवा विलंब झाल्यास वैमानिक आणि संबंधित एअरलाइन्स दोघांनाही डीजीसीएकडे स्पष्टीकरण द्यावे लागेल.pilots midnight duty उड्डाणादरम्यान हवामानातील बदल अर्थात वादळ, पाऊस, धुके किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमुळे उड्डाणाला उशीर होत असेल तर वैमानिकाला एक्स्टेंशन घेण्यास नकार देण्याचा अधिकार वैमानिकाने एक्स्टेंशन घेतलेच, तर त्याची माहिती वेळेत डीजीसीएला देणे बंधनकारक असेल.