ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड तुटला, भारताने रचला इतिहास!

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नवी मुंबई,
IND vs AUS : महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. जेमिमा रॉड्रिग्जने १२७ नाबाद धावा करून सामन्याचा नायक ठरली. तिच्यासोबत हरमनप्रीत कौरने ८९ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
 
 
IND VS AUS
 
 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फोबी लिचफिल्डच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारताने दमदार खेळी करत ३३९ धावांचा पाठलाग यशस्वीपणे पूर्ण केला. हा महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरला. यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा ३३१ धावांचा जुना विक्रम मोडला.
 
हा विक्रम विश्वचषकाच्या बाद फेरीतील पहिलाच असा प्रसंग आहे, जेव्हा कोणत्याही संघाने ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी हा विक्रम २०१५ मध्ये न्यूझीलंडच्या पुरुष संघाकडे होता (२९८ धावा). आता हा विक्रम भारताच्या महिलांनी आपल्या नावावर केला आहे.