एलिस पेरीचा धमाका! खास विक्रमासह पोचली अव्वल स्थानी

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नवी मुंबई,
IND vs AUS : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने शतक झळकावले, तर एलिस पेरीनेही चांगली अर्धशतक झळकावली. पेरी ७७ धावांवर बाद झाली. या खेळीदरम्यान तिने एक खास विक्रम केला.
 

peri 
 
 
 
एलिस पेरी आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज बनली आहे. पेरीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध १८ षटकार मारले आहेत. तिने आता दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेट दिग्गज लिझेल लीला मागे टाकले आहे. तिने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत भारताविरुद्ध १७ षटकार मारले होते. क्लोई ट्रेऑन १६ षटकारांसह यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एलिसाने एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध ११ षटकार मारले आहेत.