'मी मानसिकदृष्ट्या ठीक नव्हते, गेल्या काही...' जेमिमाचा भावनिक खुलासा! VIDEO

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नवी मुंबई,
IND vs AUS : भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली. लीग टप्प्यात अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने ३३९ धावांचे लक्ष्य ४८.३ षटकांत पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद १२७ धावांची ऐतिहासिक खेळी करत भारताचा विजय निश्चित केला आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरली.

jemima 
 
 
भावनिक होत जेमिमाने सांगितले, “मी मानसिकदृष्ट्या ठीक नव्हते, गेल्या काही महिन्यांपासून चिंता आणि नैराश्यातून जात होते. मला देव, माझे पालक आणि प्रशिक्षकांचे आभार मानायचे आहेत.” तिने पुढे सांगितले की तिला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची माहिती मैदानावर उतरण्याच्या काही मिनिटे आधीच मिळाली. “आजचा दिवस माझ्या शतकाचा नव्हता, तर देशाला विजय मिळवून देण्याचा होता,” ती म्हणाली.
 
 
 
 
या विजयासह भारताने महिला विश्वचषकाच्या इतिहासात ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठणारा पहिला संघ ठरला. हा पुरुष आणि महिला दोन्ही विश्वचषकांच्या नॉकआउट सामन्यांतील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग आहे.