जेमिमाचा सेमीफायनल शो; तुफानी शतकाने केली इतिहासात नोंद

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नवी मुंबई,
IND vs AUS : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने तडाखेबाज शतक ठोकत इतिहास रचला. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात तिने ११५ चेंडूत शतक पूर्ण केले. हे तिच्या करिअरमधील तिसरे एकदिवसीय शतक आहे.
 
JEMIMA
 
 
जेमिमा महिला विश्वचषक उपांत्य फेरीत शतक झळकावणारी दुसरी भारतीय ठरली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावा केल्या होत्या.
 
 
या सामन्यात जेमिमाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची भक्कम भागीदारी केली. शफाली वर्मा बाद झाल्यानंतर आलेल्या जेमिमाने भारतीय डावाला स्थैर्य दिले. हरमनप्रीतही शतकाच्या उंबरठ्यावर असताना झेलबाद झाली, पण जेमिमाने तुफानी खेळीने भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले.