नवी मुंबई,
IND vs AUS :  महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकाने आणि हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकाने भारताने ३३९ धावांचे लक्ष्य सहज पार केले.
 
 
पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देत इंस्टाग्रामवर “शाब्बास टीम इंडिया” असा संदेश शेअर केला, जो सध्या व्हायरल होत आहे.
 
 
 
 
या सामन्यात जेमिमाने १३४ चेंडूत नाबाद १२७ धावा केल्या, तर हरमनप्रीतने ८९ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने ११९ धावांचे शतक झळकावले. भारत आता २ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.