सुनेच्या हत्याकांडात सासूची जन्मठेपेची शिक्षा रद्द
- उच्च न्यायालयाचे आदेश
दिनांक :31-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-news विवाहितेला मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केल्यानंतर तिचा जाळून खून केल्याप्रकरणात सासूला कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठाेठावला हाेता. मात्र, सासूने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. विवाहितेने पाेलिस आणि कार्यकारी दंडाधिकारी यांना दिलेल्या जबाबात तावत आढळल्यामुळे उच्च न्यायालयाने आराेपी सासूची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली. न्यायमूर्ती उर्मिला जाेशी-ाळके आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमक्ष ही सुनावणी झाली. महत्त्वाचे म्हणजे या शिक्षेतून सासुला तब्बल 15 वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, मंगला आणि अनिल यांचा एप्रिल 2008 मध्ये विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसांतच पती अनिल, सासू विमलबाई, ननंद मनीषा या मंगला हिच्याशी क्षुल्लक कारणावरुन वाद घालत हाेत्या. तिला मारहाण करीत माहेरुन 30 हजार रुपये आणण्यासाठी दबाव टाकत हाेत्या. सतत हाेणाèया मारहाणीला कंटाळून मंगला 4 जून 2008 राेजी माहेरी निघून आली. तिने पाेलिसांत तक्रार केली की, तिची सासू आणि ननंद क्षुल्लक कारणांवरून भांडते आणि मानसिक व शारीरिक छळ करतात. पती अनिलने तिला राेज मारहाण करताे आणि आणि माहेरुन 30 हजार रुपये आणण्यासाठी दबाब टाकताे. तक्रारीनंतर सासरची मंडळी मंगलाच्या घरी आली. nagpur-news त्यांनी मंगलाला विनाअट सासरी नेण्याची तयारी दर्शविली. 10 जून 2008 राेजी ती सासरी परतली. दुसèया दिवशी, 11 जून 2008 राेजी दुपारी 1 वाजता मंगलाला भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचे तिच्या आईला ाेनद्वारे सांगण्यात आले. या घटनेत मंगला 100 टक्के भाजली हाेती. चार दिवसांनी अर्थात 15 जून राेजी मंगलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुलढाणा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी विमलबाई धवणे यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत दाेषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंड ठाेठावला, तर सहआराेपी ज्यात पती अनिल, सुरेश, चंद्रकला, मनीषा, सतीश आणि सुनील यांना निर्दाेष मुक्त केले.