रत्नागिर,
 Ratnagiri police bharti  राज्यात सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलिस दलात भरती होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये पोलिस शिपाई पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
 
 
रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयात २०२४-२५ या कालावधीत एकूण १०८ पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही पोलिस अधीक्षक आस्थापनांतर्गत तब्बल १७१ पदांची भरती करण्यात येणार आहे. या दोन्ही भरतींसाठी संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर सविस्तर माहिती उपलब्ध असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील ऑनलाइन पाहता येणार आहेत.
 
 
या भरती प्रक्रियेत Ratnagiri police bharti  प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच पुढील १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्रता दिली जाणार आहे. अंतिम निवड ही दोन्ही परीक्षांमधील एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल.अर्जासाठी दहावी, बारावी किंवा पदवीचे गुणपत्रक आवश्यक असून, दहावी उत्तीर्ण उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र ठरतील. मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांकडे संबंधित विद्यापीठाचे अधिकृत गुणपत्रक असणे बंधनकारक आहे.अर्ज करताना उमेदवारांना काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, टीसी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. तसेच, खेळाडू कोटासाठी खेळाडू प्रमाणपत्र आणि पोलिस सेवेत असलेल्या वडिलांचे प्रमाणपत्र (असल्यास) जोडावे लागेल. महिलांसाठी राखीव ३० टक्के आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र आवश्यक आहे.राज्यभरात पोलिस भरतीची ही प्रक्रिया ऑनलाइन सुरू असल्यामुळे उमेदवारांना कोणत्याही ठिकाणाहून सहज अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पोलिस दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींनी ही संधी हातातून जाऊ देऊ नये, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.