१ नोव्हेंबरपासून ७ मोठे बदल, थेट परिणाम तुमच्या खिशावर!

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Rules Change From November 1 : १ नोव्हेंबरपासून देशभरात अनेक नवे नियम लागू होत आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे. हे बदल आधार कार्ड, बँकिंग, पेन्शन, एलपीजी, क्रेडिट कार्ड, जीएसटी आणि पेन्शन योजनांशी संबंधित आहेत. काही बदलांमुळे खर्च वाढेल तर काहींमुळे थोडा दिलासा मिळेल.
 
 
1 NOVEMBAR
 
 
 
 
१. मुलांच्या आधार अपडेटसाठी शुल्क माफ
 
 
UIDAI ने मुलांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटसाठी लागणारे ₹१२५ शुल्क रद्द केले आहे. आता एक वर्षासाठी हा अपडेट मोफत करता येईल. मात्र, प्रौढांसाठी नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी बदलण्यासाठी ₹७५ आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी ₹१२५ शुल्क राहील.
 
२. बँक खात्यांसाठी ४ नॉमिनींची सुविधा
 
 
१ नोव्हेंबरपासून बँक खाते, लॉकर आणि सुरक्षित कस्टडीसाठी चार नामांकित व्यक्ती ठेवता येतील. यामुळे वारसांना निधी मिळवणे सुलभ होईल आणि कायदेशीर वाद टाळले जातील.
 
 
३. एसबीआय कार्ड वापरणाऱ्यांना नवीन शुल्क
 
 
एसबीआय कार्डद्वारे शिक्षणाशी संबंधित पेमेंट किंवा ₹१,००० पेक्षा जास्त रक्कम डिजिटल वॉलेटमध्ये लोड केल्यास आता १% शुल्क लागू होईल. त्यामुळे ऑनलाइन व्यवहारांचा खर्च वाढणार आहे.
 
४. पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र अनिवार्य
 
 
केंद्र आणि राज्य सरकारी पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे न केल्यास पेन्शन थांबण्याची शक्यता आहे.
 
५. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदलाची शक्यता
 
 
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती जाहीर करतात. त्यामुळे १ नोव्हेंबरला घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर लागू होतील.
 
६. नवीन जीएसटी स्लॅबची अंमलबजावणी
 
 
सरकार १ नोव्हेंबरपासून नवीन दोन-स्लॅब जीएसटी प्रणाली लागू करत आहे. जुने ५%, १२%, १८% आणि २८% दर रद्द करून आता साधे आणि पारदर्शक कर दर ठेवले जातील.
 
७. एनपीएस ते यूपीएस स्विचची शेवटची तारीख
 
 
केंद्रीय कर्मचाऱ्यांना एनपीएसवरून यूपीएसमध्ये स्विच करायचे असल्यास ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. या बदलामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनांमध्ये अधिक लवचिकता मिळेल.