हुडकेश्वर पोलिस ठाण्यात रन फॉर युनिटी

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Hudkeshwar Police Station राष्ट्रीय एकता दिवस आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हुडकेश्वर पोलिस ठाण्यात “रन फॉर युनिटी” कार्यक्रम उत्साहात पार पडला. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांच्या आदेशानुसार, परिमंडळ क्रमांक ४ च्या डीसीपी रश्मीता राव आणि एसीपी नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७.१० वाजता दौड सुरू झाली. या एकता दौडीत पोलिस अधिकारी, अंमलदार, शांतता समिती सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसह सुमारे २५० जण सहभागी झाले.
 
Hudkeshwar Police Station
 
दौड पोलिस ठाणे हुडकेश्वर, उदय नगर चौक, तपस्या शाळा चौक, परत उदय नगर चौक असा मार्ग घेत पुन्हा पोलिस ठाण्यात संपन्न झाली. Hudkeshwar Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी सहभागींचे आभार मानले. शांतता समिती सदस्य डॉ. दीपक शेंडेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पोलिस विभागाचे अभिनंदन केले.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र