नागपूर ,
 Sanjeevani Pranayam Khande Park महाल बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ, संजीवनी प्राणायाम, खोंडे उद्यान आणि गार्डन फ्रेंड्स यांच्या संयुक्त  बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता खोंडे उद्यानात सांज वारा या हिंदी-मराठी गीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजक अनिल मानापुरे आहेत.
 
 
 
  
 
 
यंदाच्या सांज वारा कार्यक्रमात शहरातील प्रसिद्ध गायक राजेश दुरुगकर, श्रुती चौधरी, ईशा रानडे, निखिल साठे आणि त्यांचा संच सादरीकरण करणार आहेत.Sanjeevani Pranayam Khande Park गेली  १९ वर्षे चालत असलेली  ही परंपरा रसिकांसाठी दरवर्षी आकर्षण ठरते.या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनिश्वर, ज्येष्ठ समाजसेवक  राठी, प्रा. डॉ. मृणाल हरदास (एम.डी.) आणि परिसरातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार केला जाईल.कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार दयाशंकर तिवारी प्रमुख पाहुणे  उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार प्रवीण दटके, श्रीकृष्ण खोपडे, मोहन मते, माजी आमदार विकास कुंभारे, गिरीश व्यास, अनिल सोले, सुधाकर कोहळे, माजी महापौर  पांडे, अर्चना डेहनकर आणि अन्य मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.कार्यक्रमाची संकल्पना डॉ. सुभाष राऊत, श्रीकांत देशपांडे आणि काशिनाथ मटाले यांची आहे. 
सौजन्य: अनिल मानापुरे,संपर्क मित्र