नागपूर ,
Sardar Vallabhbhai Patel भारताचे प्रथम उपपंतप्रधान आणि गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबरला  राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी नागपूर महानगरातील घाटरोड येथील सरदार पटेल यांच्या पुतळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अजनी भागाच्या सामाजिक सद्भावगतिविधी तर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला.
 
 
 
कार्यक्रमाला अजनी भाग संघचालक डॉ. रमाकांत कापरे, हनुमान नगर संघचालक  ज्ञानेश्वर बालपांडे, भाजप नेते . दयाशंकर तिवारी, Sardar Vallabhbhai Patel संजय भेंडे, विदर्भ संघटन मंत्री उमेश कोठेकर, संघ प्रांत कार्यकारिणी सदस्यरामजी हरकरे, सामाजिक सद्भाव गतिविधीचे गजानन पिलपिले व जगदीश आयचित उपस्थित होते.या वेळी भाजपचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते, महिला स्वयंसेवक, पटेल समाजाचे पदाधिकारी आणि नागपूरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थित मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर भाष्य केले.
सौजन्य:आशुतोष ठोंबरे,संपर्क मित्र