नागपूर,
Female officer dies नागपूर टपाल विभागात उघडकीस आलेल्या अंतर्गत वादाने आता शोकांत वळण घेतले आहे. पोस्टल विभागाच्या संचालक वसुंधरा गुल्हाणे-मीठे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नागपूरच्या तत्कालीन पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वसुंधरांचा मृत्यू हा सततच्या मानसिक छळ आणि कार्यस्थळी झालेल्या अपमानामुळे झाल्याचा दावा त्यांच्या पती पुष्पक मीठे यांनी केला आहे.
 
 
 
 वसुंधरा गुल्हाणे-मीठे  Female officer dies  यांनी १ जानेवारी २०२४ रोजी नागपूर टपाल विभागात संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्या काळात शोभा मधाळे या विभागाच्या पोस्टमास्टर जनरल होत्या. वसुंधरांना कार्यालयात वारंवार अपमान, टोचून बोलणे, चारित्र्यावर शंका उपस्थित करणे आणि नोकरी धोक्यात आणण्याची भीती दाखवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सततच्या ताणतणावामुळे त्यांना ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर झाला आणि अखेर १६ मे २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.वसुंधरांच्या पतीने  बोलताना सांगितले की, “माझ्या पत्नीचा मृत्यू हा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अधिकारीचा बळी आहे. तिच्यावर झालेल्या मानसिक छळाची सर्व पुरावे असलेली माहिती तिने मृत्यूपूर्वी चौकशी अधिकाऱ्याला दिली होती. मात्र, पाच महिन्यांपासून आम्ही न्यायासाठी धडपडत आहोत, तरीही आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.”वसुंधरा या यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत गावच्या रहिवासी होत्या. नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतून बीएएमएस पूर्ण केले आणि नंतर एमपीएससी व यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन २०१३ मध्ये भारतीय टपाल सेवा (IPoS) मध्ये दाखल झाल्या. त्यांनी होशंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथे सेवेत उल्लेखनीय कामगिरी केली.
 
 
ऑफिसमधील तणाव वाढत  Female officer dies  गेल्याने आणि सततच्या छळामुळे वसुंधरांचे आरोग्य ढासळले. ७ मे २०२५ रोजी त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यू जवळ असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी १० मे रोजी आपल्या पती आणि दोन लहान मुलांना भेटून अखेरचा क्षण एकत्र घालवला. आपल्या मुलगा कबीरच्या वाढदिवसाचा केक त्यांनी हॉस्पिटलच्या बेडवरच कापला आणि केवळ सहा दिवसांनंतर, १६ मे रोजी त्या कायमच्या निरोप घेतला.या घटनेनंतर टपाल खात्यातील “सत्तासंघर्ष”, अंतर्गत गटबाजी आणि महिला अधिकाऱ्यांवरील वागणुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 
 
 
काही दिवसपूर्वी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळाव्यात शोभा मधाळे आणि नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्यात झालेल्या खुर्चीच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतर विभागातील अंतर्गत मतभेद उघड झाले होते.वसुंधरांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा विभागातील वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारकडून मात्र अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.वसुंधरा गुल्हाणे-मीठे यांच्या मृत्यूनंतर टपाल विभागातील अंतर्गत कलह, कार्यसंस्कृती आणि वरिष्ठांकडून कनिष्ठांवरील वागणुकीचे प्रश्न आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.