नागपूर, 
shri-varada-sakhi-mandal लक्ष्मीनगर येथील श्री वरदा सखी मंडळाचे दिवाळी मिलन उत्साहात साजरे करण्यात आले. मासिक सभेत अंतर्गत अध्यक्ष शिल्पा टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांनी दिवाळी सणावरील आपले विचार मांडले तसेच गाणी सादर केले.
  

कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. shri-varada-sakhi-mandal फटाक्यांची नावे मर्यादित वेळेत लिहिण्याच्या स्पर्धेत अंजली दुरुगकर यांनी पारितोषिक पटकावले.या प्रसंगी रेखा साने, शैला गोडबोले, माधुरी कावरे, स्मिता देशपांडे, स्वाती पांडे, श्र्वेता मुधोळकर, वंदिता मेला, माधुरी जोशी, पद्मा साने आणि अर्चना तारणेकर यांसह मंडळाच्या बहुसंख्य सदस्यांनी उपस्थिती लावली.
सौजन्य:अंजली पांडे,संपर्क मित्र