गुरुवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत विजेच्या प्रचंड गडगडाटासह पडलेल्या जोरदार अवकाळी पावसाने Sugarcane cutting ऊसतोड करणार्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. शनिवार, नोव्हेंबर रोजी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम प्रारंभ होणार असून पूर्व तयारीच्या अनुषंगाने पुसद तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र असलेल्या अनेक गावात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या पाल टाकून मुक्कामी आल्या आहेत.
मोळीपूजन झाल्यानंतर १ नोव्हेंबरपासून कारखाना सुरळीत सुरू रहावा म्हणून ऊस तोडून ट्रक, ट्रॅक्टर मागील दोन दिवसांपासून भरून दिल्यानंतर अचानक अवकाळी पावसाने जोरदार लावली. यामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यात पावसाचे पाणी शिरून किराणा सामान, अन्नधान्याची मोठी नासाडी झाली. विजेच्या गडगडाटात आपल्या चिल्यापिल्यांसह रात्र झोपडीत काढावी लागली. अन्नधान्यासह जलतरण भिजल्याने सकाळचे जेवण शिजवणे कठीण झाल्यामुळे मोठे हाल सहन करावे लागले.