मुंबई,
Sushant Singh Rajput death case दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने पुन्हा एकदा धक्कादायक आरोप करत मोठा दावा केला आहे. “माझ्या भावाने आत्महत्या केली नव्हती, त्याची हत्या करण्यात आली होती,” असा गंभीर आरोप तिने केला असून, या दाव्यामुळे पुन्हा एकदा सुशांतच्या मृत्यूबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
 
पत्रकार शुभांकर मिश्रा यांना दिलेल्या खास मुलाखतीत श्वेताने सांगितले की, तिला अमेरिका आणि मुंबईतील दोन वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी एकसारखाच दावा करत सुशांतच्या मृत्यूबाबत माहिती दिली होती. “माझ्याशी संपर्क साधणाऱ्या एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने मला सांगितले की, सुशांतची हत्या झाली आहे. दोन लोक आले होते आणि त्यांनी त्याला ठार केलं,” असे श्वेता म्हणाली.श्वेताने पुढे सांगितले की, अमेरिकेतून तिच्याशी संपर्क साधणाऱ्या व्यक्तीची गॉडमदर ध्यानधारणेत असते आणि तिनेच या घटनेबाबत प्रथम सांगितले होते. “ती आमच्याबद्दल काहीही जाणत नव्हती. तरीही तिने स्पष्टपणे सांगितलं की माझ्या भावाची हत्या झाली आहे,” असा दावा श्वेताने केला.
 
 
त्यानंतर मुंबईतील Sushant Singh Rajput death case एका मानसशास्त्रज्ञानेही तिच्याशी संपर्क साधत अगदी तसाच खुलासा केल्याचे श्वेता म्हणाली. “दोन्ही वेगळ्या ठिकाणाहून आणि एकमेकांना न ओळखणाऱ्या व्यक्तींनी मला तीच गोष्ट सांगितली, हे केवळ योगायोग असू शकत नाही,” असं श्वेता म्हणाली.१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत मुंबईतील बांद्र्यातील राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या अकस्मात निधनाने संपूर्ण बॉलिवूड तसेच देशभरात धक्का बसला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस, ईडी, एनसीबी आणि सीबीआय अशा विविध यंत्रणांनी केला होता.काही दिवसांपूर्वी सीबीआयने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करत सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या म्हटले आहे. या रिपोर्टनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यावर कोणताही ठोस पुरावा आढळला नाही. सीबीआयने त्यांच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून दोघांनाही क्लीन चीट दिली आहे.
 
 
तथापि, सुशांतच्या Sushant Singh Rajput death case कुटुंबीयांनी सीबीआयचा हा निष्कर्ष मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांचे वकील वरुण सिंह यांनी सांगितले की, “हा क्लोजर रिपोर्ट म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळफेक आहे. जर सीबीआयला खरंच सत्य बाहेर आणायचं असेल, तर त्यांनी सर्व पुरावे, चॅट्स, वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक नोंदी सादर करायला हव्यात.” त्यांनी या क्लोजर रिपोर्टविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.श्वेता सिंह किर्तीच्या या नव्या दाव्यानंतर सुशांतच्या Sushant Singh Rajput death case मृत्यूचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. आता या दाव्यांवर तपास यंत्रणा काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.