तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षाचा एकावर प्राणघातक हल्ला

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
मंगरुळनाथ,
vinod nirakar chaudhary चेहेल येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विनोद निराकार चौधरी यांनी शेतीच्या क्षुल्लक वादातून एका ५३ वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना २८ ऑटोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. तालुक्यातील चेहेल येथील रहिवासी जिवनधर शामराव चौधरी (वय ५३) हे २८ ऑटोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतातून बैल घेऊन चेहेल रस्त्याने घरी परत जाताना त्यांचे शेजारचे विजय चौधरी यांनी त्यांना अडवून तुम्ही तुमचे बैल माझ्या शेताकडे का आणले?
 
 

vinod chaudhari 
 
 
असा जाब विचारला जिवनधर चौधरी यांनी मी माझ्या शेतात बैल चारून घरी नेत आहे, असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय चौधरी यांनी काहीएक विचार न करता संतापून शिवीगाळ केली व हातातील लोखंडी पाईपने जिवनधर चौधरी यांच्या डाव्या हातावर व खांद्यावर जोरदार मारहाण केली. तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विनोद चौधरी हे हातात कुर्‍हाड घेऊन आले. त्यांनी कोणताही समेट न करता, जिवनधर चौधरी यांच्यावर थेट हल्ला चढवला आणि त्यांच्या डोयावर कुर्‍हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली.vinod nirakar chaudhary जिवनधर चौधरी यांच्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी विजय निराकार चौधरी व तंटामुक्त अध्यक्ष विनोद निराकार चौधरी यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.