महाविकास आघाडीला धक्का : उदय सांगळे भाजपमध्ये जाणार

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नाशिक,
Mahavikas Aghadi आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते उदय सांगळे पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
 
 
 
Mahavikas Aghadi
उदय सांगळे हे Mahavikas Aghadi  नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील प्रभावशाली नेते असून त्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध लढा दिला होता. या निवडणुकीत त्यांना एक लाखांहून अधिक मत मिळाले होते, मात्र ते विजय मिळवण्यात यशस्वी झाले नाहीत. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून येत्या चार ते पाच दिवसांत अधिकृत प्रवेश होणार असल्याचे ठरले आहे.याशिवाय, दिंडोरी तालुक्यातही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार रामदार चारोस्कर यांचे पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या घटनांमुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलू लागली असून तालुकास्तरावर भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, महाविकास आघाडीतील या नेतृत्त्वाच्या बदलामुळे स्थानिक निवडणुकांवर थेट परिणाम होऊ शकतो. उदय सांगळे यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर भाजपसाठी ही संधी त्यांच्या प्रभावी नेतृत्वाचा लाभ घेण्याची ठरते आहे.या घडामोडींचा जिल्ह्यातील राजकीय वातावरणावर आणि आगामी निवडणुकीच्या निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.