गडचिरोली,
mla dr narote सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी आयुष्य अर्पण केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजात एकात्मता आणि समरसतेचा संदेश पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समरसता, एकता आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्यावतीने गडचिरोली येथे नगरपरिषदेच्या सफाई कामगारांची सद्भावना दौड आयोजित करण्यात आली. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
 
 
 
  
 
 
स्थानिक इंदिरा गांधी चौकातून सफाई कामगारांच्या उपस्थितीत या दौडीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अनिल पोहनकर, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, तसेच सतीश चीचघरे, हेमंत राठी, अनिल कुनघाडकर, केशव निंबोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.mla dr narote या दौडीत सहभागी सफाई कामगारांनी उत्साहात सहभाग घेत, एक भारत-श्रेष्ठ भारत या घोषणांनी परिसर दुमदुमविला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या सद्भावना दौडीमुळे समाजात एकतेचा, स्वच्छतेचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश प्रसारित झाला.