२०-२५ माणसांसमोर बोली लागते स्त्रियांची! ISISच्या भयंकर बाजाराचा उलगडा

    दिनांक :31-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
women-for-sale जगातील सर्वांत निर्दयी आणि क्रूर दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएसआयएसच्या (ISIS) तथाकथित ‘जन्नत’मध्ये महिलांचे जीवन प्रत्यक्षात नरकासमान आहे. बाहेरून धार्मिक स्वर्गाची प्रतिमा दाखवणाऱ्या या संघटनेच्या आत मात्र महिलांवर अत्याचार, गुलामी आणि विक्रीचे भयावह जग लपलेले आहे. याच काळ्याकुट्ट वास्तवाचा पर्दाफाश प्रसिद्ध गुन्हेगार पत्रकार हुसैन जैदी यांच्या ‘हुसैन जैदी फाईल्स’ या पॉडकास्टमध्ये करण्यात आला आहे.
 
women-for-sale
 
या पॉडकास्टच्या एका भागात संशोधक करिश्मा यांनी इराक, सिरिया, खोरासान आणि अफगाणिस्तानातील महिलांच्या गुप्त “बाजारां”चा थरारक उलगडा केला आहे. करिश्मा दोनदा इराकला गेल्या असून तिथे त्यांनी स्थानिक पोलिस व स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी लाल आणि निळ्या गालिच्यांनी सजवलेल्या गुप्त जागांवर महिलांची बोली लावली जाते. सुमारे वीस ते पंचवीस पुरुष उपस्थित असतात आणि महिलांना केसांनी ओढत आणले जाते. त्यानंतर त्या महिलांना उभे करून लिलावासारखी बोली घेतली जाते. women-for-sale त्यांची किंमत ऐकली की कोणाच्याही अंगावर काटा येईल — अवघ्या ५० डॉलर्स म्हणजे सुमारे ४,२५० रुपयांत “कुमारी” मुली विकल्या जातात, तर ज्या मुली कुमारी नसतात त्यांची किंमत आणखी कमी केली जाते. या तपासात एक भीषण सत्य समोर आले  — भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुली या विशेषतः या व्यापाराच्या जाळ्यात अडकवल्या जातात. सोशल मीडियावर भावनिकदृष्ट्या कमजोर मुली शोधून त्यांना खोट्या प्रेमाचे, परदेशात शिक्षणाचे किंवा लग्नाचे आमिष दाखवले जाते. फोटो एक्सचेंज, गप्पा आणि भावनिक जवळीक निर्माण करून त्यांचा ‘ब्रेनवॉश’ सुरू होतो. त्यानंतर या मुलींना परदेशात पाठवून गुलामीत विकले जाते किंवा आत्मघाती बॉम्बस्फोटक बनवलं जाते. आयएसआयएसची विचारसरणीही तितकीच विकृत आहे. त्यांच्या मते, भारतीय स्त्रिया “लढाऊ” नसून केवळ आत्मघाती बॉम्ब घेऊन उडण्यासाठीच योग्य आहेत; तर अरब महिलांना युद्धासाठी प्रशिक्षित केले जाते.
करिश्माच्या संशोधनातून स्पष्ट होते की हे “भरतीकरण” नसून मानव तस्करीचे नेटवर्क आहे. women-for-sale २०१४ मध्ये अबू बकर अल-बगदादीच्या नेतृत्वाखाली आयएसआयएसने महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये भारतातून पहिल्यांदा महिलांसह २१ ते २७ जण या संघटनेत सामील झाले होते. त्यात काश्मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील महिला होत्या. मात्र २०२४ मध्ये या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली — जानेवारीत २८, फेब्रुवारीत ३७, मार्चमध्ये ३६ आणि एप्रिलमध्ये तब्बल ६८ भारतीय मुली या जाळ्यात अडकल्या, असे एटीएसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणाने एकच सत्य अधोरेखित होते — दहशतवादाचा चेहरा धार्मिक नसून मानवी क्रौर्याचे विकृत रूप आहे, आणि त्याच्या सर्वाधिक निर्दयी शिकार ठरतात त्या — स्त्रिया.