वाशीम,
vijayakaka pophali प.पू.सद्गुरू पंडितकाका धनागरे महाराज यांचे सारे जीवन आदर्शवत् असे होते.अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेचे कटाक्षाने पालन करून कर्मावर त्यांचा विशेष भर होता.आयुष्यात धन,संपत्ती यांची आवश्यकता असतेच पण शेवटी ते सोबत येत नाही तर आपल्या सोबत केवळ आपले केलेले कर्मच येत असते व म्हणून या संसार सागरातून तरून जाण्यासाठी भाविकांनी सत्कर्म करीत राहणे हे श्रेयस्कर आहे असे उद्बोधन प.पू. विजयकाका पोफळी महाराज यांनी येथे केले. येथील श्री वासुदेव आश्रम अभ्यासिकेत श्री कूष्मांड नवमीच्या पर्वावर शुक्रवार ३१ ऑटोबर रोजी ‘पत्र प्रबोध’ या पुस्तिकेचे प्रकाशन करताना ते भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
 
 
 
  
 
 
प.पू.पंडितकाका धनागरे महाराज यांनी शिष्यांना अथवा भाविकांना पाठविलेल्या पत्रांचा यात समावेश आहे.हा पुस्तिका रुपी ग्रंथ असून यातून भाविकांना पंडितकाकांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले आहे असेही ते म्हणाले. या प्रसंगी व्यासपीठावर संकेश्वर पीठाचे शंकराचार्य,प.पू.विजयकाका पोफळी महाराज व महाजेन्केचे संचालक विश्वास पाठक उपस्थित होते. सातत्याने सत्कर्म केले तर त्या कर्माने चित्तशुद्धी होते,त्यामुळे प्रत्येकाने नित्यकर्म केलेच पाहिजे.यावर पंडितकाकांचा भर होता.पण ते भाविकांच्या प्रापंचिक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असत.साधकांच्या अनेक समस्या दूर करुन ते साधकांना उपासना मार्गी लावत असत.असे विजयकाका पोफळी महाराज म्हणाले. ऐश्वर्य किंवा प्रपंच वाईट नाही तर त्यातील आसक्ती वाईट असते.आपल्यासोबत हे काहीच येत नाही तर केवळ आपले केलेले कर्मच शेवटी सोबत येते म्हणून जीवनात सत्कर्मच केले पाहिजे अशी प.पू.पंडितकाकांची शिकवण होती असेही विजयकाका पोफळी महाराज म्हणाले. हा मनुष्य जन्म आत्मकल्याणासाठीच आहे.पत्र प्रबोधचे मन:पूर्वक वाचन केले तर आपणास  या ग्रंथातून आध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल कारण हा एक दीपस्तंभ आहे असेही विजयकाका म्हणाले.
आश्रमातील अखंड सेवा अशीच सुरू राहो:शंकराचार्य मी अनेक  वर्षांपासून येथे येत आहे.तेव्हाचे स्वरूप आणि आश्रमाचे आत्ताचे स्वरून यात खूप बदल झाला आहे.vijayakaka pophali ही वास्तू उभी राहणे ही केवळ गुरूकृपा आणि महाराजांचे आशीर्वाद यामुळेच आहे.या वासुदेव आश्रमात प्रत्येक साधक संध्या करतात,सर्वच साधक सेवा करतात ही अत्यंत आनंदाची बाब आहे.या आश्रमात ही सेवा अशीच अखंड सुरू राहो असे उद्बोधन संकेश्वर पीठाचे शंकराचार्य यांनी यावेळी केले. देवाकडे धर्माकडे प्रीती असावी,सन्मती, सत्संगती मागावी तसेच भुक्ती आणि मुक्ती  मागावी असेही ते म्हणाले. मी येथे प.पू.पंडितकाकांचा पाईक म्हणून येथे आलो असे शंकराचार्यांनी सांगितले.
 
प.पू.पंडितकाका मातृवत्सल होते:विश्वास पाठक
प.पू.पंडितकाका हे मातृवत्सल होते.याचा अनेकांना अनुभव आला आहे.पत्र प्रबोध यातून पंडितकाकांनी साधकांना मार्गदर्शनच केले आहे.ज्ञानार्जनासाठीच ते अनेकांना पत्र लिहित असत असे या प्रसंगी बोलताना महाजेन्कोचे संचालक विश्वास पाठक म्हणाले.
त्यांनी याप्रसंगी प.पू.पंडितकाकांच्या तसेच प.पू.विजयकाका पोफळी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंगही सांगितले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात साधकवर्ग उपस्थित होता.