खविसच्या आमसभेत ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचा ठराव

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
देवळी,
crop damage Devli अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून संपूर्ण शेत पाण्याखाली येऊन कापूस, सोयाबीन व इतर पिके नष्ट झाली आहे. फळबागांचेही नुकसान झाले. पिकांची विदारक स्थिती असून शेतकरी आर्थिक, मानसिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, असा ठराव देवळी सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या आमसभेत घेण्यात आला.
 

crop damage Devli  
खविसचे अध्यक्ष अमोल कसणारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेत शेतकर्‍यांची बाजू भकमपणे मांडण्यात आली. शेतकर्‍यांच्या हितासाठी सर्व प्रकारच्या धान्याची खरेदी सुरू करण्याचा तसेच इतर योजनांना चालना देण्याचा मानस व्यत करण्यात आला. शिवाय संस्थेच्या उत्पन्नासाठी २० गाळ्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.अमोल कसणारे यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा अहवाल सादर केला. संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचा विचार त्यांनी व्यत केला. संचालन व्यवस्थापक चंद्रशेखर मून तर आभार गणेश पाचडे यांनी मानले.
यावेळी संचालक प्रमोद ठाकरे, सुरेश खडसे, मनोज दीर्घीकर, विजय पेटकर, संदीप आडकिने, हेमंत कापकर, सिंधू ठाकरे, किशोरी डफरे, तसेच भागधारक शेतकर्‍यांची मोठी उपस्थिती होती.