आग्याराम देवी मंदिरात उद्या महाप्रसादाचे आयोजन

नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने साजरा

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Agyaram Devi Temple : गणेशपेठ येथील आग्याराम देवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. मुख्यत: दीपप्रज्वलन प्रसंगी धर्मादाय आयुक्त खंडेलवाल, सहाय्यक पोलीस अनिता मोरे, पोलीस निरीक्षक संजय मेंढे उपस्थित होते.
 
 
ganeshpeth-agyaramdevi
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दटके, आमदार कृपाल तुमाने, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी देवीची पूजा करीत आशीर्वाद घेतले. मंदिरात कन्याभोज झाल्यानंतर दिव्याचे विसर्जन करण्यात आले. दरम्यानच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिर ट्रस्टच्या वतीने ५ रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन महेशकुमार गोयल, विकास पेटकर, गिरजाशंकर अग्रवाल, हरिओम अग्रवाल, सुरेश तिवारी आदींनी केले आहे.